Saturday, June 9, 2007

मराठीत लिहा... इंग्रजी माध्यमातून

QUILLPAD या संकेतस्थळावर मराठीमधून लिहिण्यासाठी सोय आहे. तुम्हाला फक्त मराठी शब्द इंग्रजी मधे लिहायचे आहेत. मराठी मधे ते लगेच दिसू लागतात.
मराठी लिहिण्यासाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे.


Monday, June 4, 2007

उदास

वाटल होतं एकदा जावं सगळ सोडून,
पण कोणाला सोडणार

त्या गावच्या वेशी,
तो नाम्या जोशी,
सूरपारंब्यांचा खेळ,
शिवकृपा ची भेळ!

तो जमीन जुमला,
तो विटेरी बंगला,
तळपणारी आभाळमाया,
बांदावरल्या बाभळीची छाया!

ते चिंचा खाणं,
आज्याचं ओरडणं,
तो बागातला ऊस,
ती आजीची कूस!

आईवरचा जीव,
बाबांची काळजी,
मळ्यातलं गुऱ्हाळ,
दिवाळीचा फराळ!

फडफडणाऱ्या उदासीनतेला,
भविष्याची घाई,
उद्याची चिंता करत,
मन भूतकाळात जाई.