उदास
वाटल होतं एकदा जावं सगळ सोडून,
पण कोणाला सोडणार
त्या गावच्या वेशी,
तो नाम्या जोशी,
सूरपारंब्यांचा खेळ,
शिवकृपा ची भेळ!
तो जमीन जुमला,
तो विटेरी बंगला,
तळपणारी आभाळमाया,
बांदावरल्या बाभळीची छाया!
ते चिंचा खाणं,
आज्याचं ओरडणं,
तो बागातला ऊस,
ती आजीची कूस!
आईवरचा जीव,
बाबांची काळजी,
मळ्यातलं गुऱ्हाळ,
दिवाळीचा फराळ!
फडफडणाऱ्या उदासीनतेला,
भविष्याची घाई,
उद्याची चिंता करत,
मन भूतकाळात जाई.

