Friday, April 4, 2008

आणि हे आपणास माहीत आहे का?


...की स्टारफिशना मेंदू नसतो...?
...की डासांना दात सुद्धा असतात...?
...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते...?
...की खेळातील फाशांच्या विरुद्ध बाजूंवरील आकड्यांची बेरीज ७ असते...?
...की घरातली माशी फक्त १४ दिवस जगते...?
...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?
...की दक्षिण अमेरिकेतील खवले मांजर दिवसाला ३०,००० पेक्षा जास्त मुंग्या खाते...?
...की ब्रिटनच्या भोवती १०४० बेटे आहेत...?
...की सूर्यमालेतील फक्त शुक्र ग्रह घडाळ्याच्या काट्यांच्या दिशेने फिरतो व बाकीचे सर्व विरुद्ध दिशेने फिरतात...?
...की मृत समुद्र हा समुद्रसपाटीपासून सुमारे ३६५ मी. खाली आहे...?
...की एस्किमो लोक अन्न गोठण्यापासून वाचविण्यासाठी शीतकपाटाचा (फ्रीज) वापर करतात...?
...की एकाच परीघाच्या सर्व आकारांमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असते..?
...की भारतात पहिली प्लॅस्टिकची पिशवी १९८५ साली वापरण्यात आली..?
...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता...?
...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात...?
...की शार्क माशांना माणसाला माहित असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही...?
...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे...?
...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत...?
...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात...?
...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात...?
...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे...?
...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही...?
...की बदकाच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी येत नाही...?
...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ...?
...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात...?
...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात...?
...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात...?
...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही...?
...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही...?
...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ...?
...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही...?
...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते...?
...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे...?
...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत...?
...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते...?
...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही...?
...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे...?
----------------------------------------------------------------------
मूळ संकेतस्थळ: मराठी ज्ञानकोश (विकिपीडिया)

Saturday, June 9, 2007

मराठीत लिहा... इंग्रजी माध्यमातून

QUILLPAD या संकेतस्थळावर मराठीमधून लिहिण्यासाठी सोय आहे. तुम्हाला फक्त मराठी शब्द इंग्रजी मधे लिहायचे आहेत. मराठी मधे ते लगेच दिसू लागतात.
मराठी लिहिण्यासाठी हे एक उत्तम संकेतस्थळ आहे.


Monday, June 4, 2007

उदास

वाटल होतं एकदा जावं सगळ सोडून,
पण कोणाला सोडणार

त्या गावच्या वेशी,
तो नाम्या जोशी,
सूरपारंब्यांचा खेळ,
शिवकृपा ची भेळ!

तो जमीन जुमला,
तो विटेरी बंगला,
तळपणारी आभाळमाया,
बांदावरल्या बाभळीची छाया!

ते चिंचा खाणं,
आज्याचं ओरडणं,
तो बागातला ऊस,
ती आजीची कूस!

आईवरचा जीव,
बाबांची काळजी,
मळ्यातलं गुऱ्हाळ,
दिवाळीचा फराळ!

फडफडणाऱ्या उदासीनतेला,
भविष्याची घाई,
उद्याची चिंता करत,
मन भूतकाळात जाई.

Friday, May 25, 2007

ठेवणीतल्या म्हणी

खिशात नाही आणा, अन्‌ मला बाजीराव म्हणा.

Monday, May 21, 2007

माधोळी

लिहीताना बरंच काही लिहायच राहून जातं,
सूटलेल्या शब्दांनाही सांगायच राहून जातं,
कितीही पडलो तरी उभे राहण्याची उमेद सोडलेली नाही,
बूडालेल्या पापण्यांनी आजही खळी भरलेली नाही.

... माधव